Dhangar will do his best for the development of the society and shepherd brothers धनगर समाज व मेंढपाळ बांधवांच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार
मुक्ताईनगर : ऊन, वारा व पाऊस अशा कठीण परिस्थितीत धनगर समाज मेंढी पालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. मेंढ्यांना वनक्षेत्रात चराई केल्यामुळे वन विभागामार्फत मेंढपाळांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दखल करण्यात आले असून मेंढपाळांवरील गुन्हे रद्द करण्यासह धनगर समाज व मेंढपाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून राज्यासह केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी येथे दिली.जय मल्हार मेंढपाळ सेना व समस्त धनगर समाज, मुक्ताईनगर तालुका यांच्या वतीने भव्य धनगर समाज निर्धार मेळाव्यात खासदार बोलत होत्या.
यांची मेळाव्यास उपस्थिती
यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह आमदार चंद्रकांत पाटील, जय मल्हार सेना सरसेनापती लहूजी शेवाळे, रंजना बोरसे, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, भाजपा तालुका सरचिटणीस, चंद्रकांत भोलाने, भाजपा शहराध्यक्ष पंकज कोळी, नामदेव बाजोड, कारभारी दांडगे, मनोज मोरे, सुधाकर जुमले, कैलास वाघ, रामभाऊ घुले, सूर्यभान कवळे, भावराव तांबे, साहेबराव करडे, हिरामण येळे, रवींद्र पाचपोळ, बाळू शिंदे, पुंडलिक सरक, शंकर केसकर, संदीप जुमळे, सीताराम बिचकुले, भारत मदने, सोना खताळ, तानु नानकर, मका कांदडे, देमा नानवर, भिका माने, भावडा कोळपे, दिगंबर कांदडे, तुळशिराम गोयकर, पंढरी पडळकर, दादाराव बिचकुले यांच्यासह असंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते.

