केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्रातर्फे केळीवरील सीएमव्ही रोगाची पाहणी


मुक्ताईनगर : कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार संचालित केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिक यांच्या तज्ञ अधिकार्‍यांनी शनिवारी खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मस्कावद, ता.रावेर येथे भेट देऊन केळी पिकावर आलेल्या कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) रोगाची पाहणी केली. तज्ञ अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील केळी भागाचा दौरा केला. यावेळी खडसे यांनी त्यांना केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या सांगून अहवाल सादरीकरणाच्या सूचना केल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार खडसे यांच्यासह केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नाशिकचे सहायक संचालक डॉ.अतुल ठाकरे, सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी विशाल काशीद, सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी ऋषीकेश मानकर, केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ जी.पी.देशमुख, तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत माळी व भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, सुनील पाटील, महेंद्र पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह परीसरातील केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !