पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळातील स्वछता कर्मचार्‍यांचा पुरस्काराने गौरव


भुसावळ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवाडचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील श्री नमो विचारमंच, साईनिर्मल फाउंडेशन व रुपेश देशमुख मित्र परीवाराच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना ‘स्वच्छता पुरस्कार दूत सन्मान 2022’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वच्छता कर्मचारी शहराचा कणा
श्री नमो विचार मंच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शिशिर जावळे, माजी नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंह) ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वच्छता कर्मचारी हा सुद्धा समाजव्यवस्था, आरोग्य व शहर विकासाचा एक मुख्य कणा असून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता सर्वांना चांगली स्वच्छता व आरोग्य प्राप्त व्हावे मिळावे यासाठी अहोरात्र स्वच्छता सेवा करीत असणारे स्वच्छता कर्मचारी खर्‍या अर्थाने या समाजाचे हिरो असल्याचे मान्यवर म्हणाले. जनतेने या उपक्रमाचा आदर्श घेऊन कर्मचार्‍यांना सन्मानाने वागणूक द्यावी, असे प्रतिपादन याप्रसंगी मान्यवरानी मनोगतातून व्यक्त केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, नगरसेवक पिंटू ठाकूर, समाजसेवक रुपेश देशमुख, डॉ.राष्ट्रीय संत सुरक्षा परीषदेचे जळगाव जिल्हा सचिव चंद्रशेखर आनंदा पाटील, गंगाराम नन्नवरे, भुसावळ नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी या सर्व कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी हॉट पॉट टी चे संचालक अर्जुन भैय्या मदन दास, मोहन कासार, आर.के.कोळी, कपिल पहुरकर, देवेंद्र वराडे आदींनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !