किनगावातून दुचाकी चोरीप्रकरणी अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक

यावल पोलिसांची कारवाई : चोरीची दुचाकी पोलिसांकडून जप्त : अन्य चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


Attal two-wheeler thieves arrested in case of two-wheeler theft from Kingaon यावल :  यावल तालुक्यातील किनगाव गावातून दुचाकी चोरी केल्याप्रकरणी दोन दुचाकी चोरट्यांना यावल पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपींच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किनगाव गावातून लांबवली दुचाकी
किनगाव, ता.यावल येथून चिंचोली येथील देवेंद्र अशोक साळुंखे हे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.के.1239) ने 11 ऑक्टोंबर 2022 रोजी बाजाराला आले असता गावातील बाजीराव नगरातील आठवडे बाजारातून दुचाकी लांबवण्यात आली होती. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा गुन्हे शाखेने नवीद शेख एजाज (रा.मन्यार अळी, अडावद, ता.चोपडा) व दीपक संजय शेटे (रा.प्लाट भाग, अडावद) यांना अटक केली होती. आरोपींनी किनगावातुन दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर आरोपींना यावल पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !