निमगावातील प्रौढाला शेतात काम करताना सर्पदंश !
An adult in Nimgaon was bitten by a snake while working in the field! यावल : यावल तालुक्यातील निमगाव येथे शेत शिवारात काम करत असताना एका 52 वर्षीय इसमाला सर्पसदृश्य दंश झाला. हा प्रकार निदर्शनास येतात त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्याच्यावर येथे उपचार सुरू आहे.
तातडीने उपचारामुळे प्रकृती स्थिर
निमगाव येथील जितेंद्र गोपीचंद पाटील हे शेत शिवारात काम करत होते काम करत असताना त्यांच्या उजव्या पायाला अचानक दंश झाला. त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. डॉ.सचिन देशमुख, अधिपरीचारीका आरती कोल्हे, सुमन राऊत बापू महाजन आदींनी उपचार केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

