रसलपूर येथे दुकान फोडले : दहा हजारांचा ऐवज लांबवला


A shop was broken in Rasalpur: compensation of ten thousand was extended रावेर : तालुक्यातील रसलपूर येथील योगेश्वर ट्रेडर्स दुकान फोडून चोरट्यांनी दोन हजारांची रोकड व आठ हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लंपास केले. ही घटना १५ ते १६ रोजी दरम्यान घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
रसलपूर येथे निलेश उर्फ नंदू लक्ष्मण महाजन (४६, रसलपूर) यांचे योगेश्वर ट्रेडर्स नामक दुकान असून चोरट्यांनी १५ रोजी रात्री आठ वाज ते १६ रोजीच्या सकाळी आठ वाजेदरम्यान दुकान फोडून त्यातील दोन हजारांची रोकड व आठ हजार रुपये किंमतीची सीसीटीव्ही कॅमेरे लंपास केले. तपास नाईक जगदीश पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !