मुक्ताईनगरात औषध दुकानातून तीन हजारांची रोकड लांबवली


In Muktainagar, a cash of three thousand was stolen from a drug store मुक्ताईनगर : शहरातील वात्सल्य बाल रुग्णालयातील औषध दुकानातून तीन चोरट्यांनी तीन हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
डॉ.शिवाजी एकनाथ चौधरी (३६, मुक्ताईनगर) यांचे वात्सल्य बाल रुग्णालय आहे. या रुग्णालयातच मेडिकल स्टोअर्स असून खिडकीचे लॉक ब्रेक करीत चोरट्यांनी गल्ल्यातील तीन हजारांची रोकड लांबवली. बुधवार, १६ रोजी पहाटे पाच वाजता हा प्रकार उघडकीस आला. तपास हवालदार महंमद तडवी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !