बांधकाम झालेली जागा बखळ दाखवत शासनाचा बुडवला महसूल : फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांविरोधात गुन्हा


Govt lost revenue by disrespecting the constructed Area : Crime Against Seven People In Savada सावदा : फैजपूर येथील एका संस्थेतील कर्जदार व्यक्तीची बांधकाम झालेली जागा बखळ असल्याचे दाखवून शासनाचा महसूल बुडवत खरेदी केल्याप्रकरणी सावदा पोलिसात सात जणांविरोधात दुय्यम निबंधक यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बांधकाम झाले असतानाही दाखवली बखळ जागा
सावद्यातील दुय्यम निबंधक प्रशांत विलासराव कुलकर्णी (४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फैजपूर विविध कार्यकारी सोसायटी लि. ठेव संकलन कर्जवाटप विभाग लि.फैजपूरतर्फे शासनमान्य विशेष वसुली अधिकारी भगवंत लक्ष्मण पाटील, चेअरमन सुमाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या आमोदेतर्फे अनिल विनायक पाटील (आमोदे), जितेंद्र प्रकाश पवार (सावदा, मयत), कविता जितेंद्र पवार (सावदा, वारस), युगंधर जितेंद्र पवार (दोघे रा.सावदा, वारस), अमिता हेमराज चौधरी (फैजपूर), नितीन चंद्रकांत पाटील (फैजपूर) यांनी सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ८ जुलै २०१३ तसेच ७ मार्च २०१९ व १७ जानेवारी २०२२ रोजी बांधकाम झालेली जागा बखळ असल्याचे दाखवून शासनाचा महसूल बुडवला. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार उस्मान तडवी, हवालदार संजय चौधरी, उमेश पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !