भुसावळात दरोड्यापूर्वीच अट्टल गुन्हेगार बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


Even before the robbery in Bhusawal , the inveterate criminal market was caught by the police भुसावळ : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. तस्लीम शेख उर्फ काल्या सलीम शेख (३५), कलीम शेख सलीम शेख (३२) व गिरीश गोकुलसिंग जोहरी (२०, सर्व रा.दिनदयाल नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

दरोड्यापूर्वीच आवळल्या मुसक्या
शहरातील नाहाटा महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस काही संशयीत दरोड्याच्या तयारीत हत्यारांसह असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी १७ रोजी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास धाव घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संशयीतांच्या ताब्यातून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सहाय्यक फौजदार शरीफोद्दीन काझी यांच्या फिर्यादीनुसार संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !