भुसावळात पुन्हा एकाचा आत्मदहनाचा इशारा मात्र संबंधित फिरकलेच नाही


But the warning of self-immolation in Bhusawal was not heard भुसावळ : भुसावळ न्यायालयाच्या आवारात दोन दिवसांपूर्वीच शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता मात्र त्यानंतर पुन्हा शुक्रवारी आत्मदहन करण्याचा इशारा डोबिवली येथील भूषण पाटील यांनी दिल्याने शहर पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला मात्र पाटील न्यायालयाच्या आवारात आले नाहीत.

न्यायालयात आवारात पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, गोपनीय विभागाचे प्रमोद पाटील, राजेश बोदडे आदी पोलिस कर्मचारी यांनी न्यायालयाच्या परीसरात बंदोबस्तासाठी दाखल झाले होते. दिवसभरात पाटील हे न्यायालयाच्या परिसरात आलेच नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पाटील न्यायालयात शिरतील यासाठी न्यायालयाच्या प्रवेशद्ारावरच पोलिस कुमक ठेवण्यात आली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !