किनगावातील दुचाकी चोरी प्रकरणी आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
यावल : तालुक्यातील किनगाव येथून दुचाकी चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना यावल न्यायालयाने शनिवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडीत त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे अजुन काही प्रकार समोर येतील का ? याकडे लक्ष लागले आहे.
आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
किनगाव, ता.यावल येथील बाजीराव नगरात आठवडे बाजार भागातून चिंचोली येथील अशोक साळुंखे यांची दुचाकी (क्रमांक एम. एच.१९ बी.के. १२३९) ही ११ ऑक्टोंबर २०२२ रोजी चोरी झाली होती व या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जिल्हा गुन्हे शाखेने नवीद शेख एजाज (रा.मन्यार अळी, अडावद, ता.चोपडा व दीपक संजय शेटे (रा.प्लाट भाग, अडावद) या दोघांना अटक केल्यावर दोघांनी किनगावातुन दुचाकी चोरीची सांगीतले होते तेव्हा यावल पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले व यावल न्यायालयात हजर केले असता दोघांना शनीवार पर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडीत त्यांनी यावल तालुक्यात अजुन कुठून दुचाकी चोरी केली आहे का याचा तपास आता पोलिस करीत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.

