सांगवी खुर्दला हळदीत नाचण्यावरून मारहाण : चौघाविरोधात गुन्हा
सांगवी खुर्द गावातील घटना : वयोवृद्धाच्या डोक्यात लोखंडी फावडा मारत केली शिविगाळ व मारहाण
Beating up Sangvi Khurd for dancing in Haldi: Crime against four यावल : तालुक्यातील सांगवी खुर्द या गावात हळदीच्या कार्यक्रमात वाजंत्री सुरू असताना नाचण्यावरून वाद निर्माण झाल्याने ६० वर्षीय वयोवृद्धासह अन्य दोघांना चौघांनी मारहाण केली. ही घटना गुरुवार. १७ रोजी रात्री १० वाजता घडली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
सांगवी खुर्द, ता.यावल या गावात हळदीचा कार्यक्रमात वाजंत्री सुरू असताना नाचण्यावरून वाद झाला. संशयीत कल्पेश रमेश पवार, राहुल विजय सावळे, विनायक सुरेश पवार व केदार विजय सावळे (धनगर, रा. सांगवी खुर्द) या चौघांनी नारायण बारकू चौधरी (६०) व त्यांची मुलगी प्रमिला विनोद पाटील, लहान मुलगा पंकज नारायण चौधरी यांना शिवीगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी फावड्याच्या लाकडी दांड्याने दुखापत केली व आमच्या नादाला लागला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.

