खिर्डी येथून दुचाकी लांबवली
Bike extended from Khirdi खिर्डी : गावातील शेतकरी राजेंद्र रवींद्र भंगाळे (३५) यांनी घराजवळ लावलेली २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.१९ डी.५८०३) १६ ते १७ दरम्यान चोरट्यांनी केव्हातरी लांबवली.
निंभोरा पोलिसात गुन्हा
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर निंभोरा पोलिसात भंगाळे यांनी धाव घेत तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार ज्ञानेश्वर चौधरी करीत आहेत.

