मुक्ताईनगरातील अंगणवाडीतून सिलिंडर लांबवले
Cylinders extended from Anganwadi in Muktainagar मुक्ताईनगर : शहरातील अल्फला शाळेजवळील अंगणवाडी क्रमांक १८ मधून चोरट्यांनी दोन हजार दोनशे रुपये किंमतीचे सिलिंडर लांबवले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
अंगणवाडी मदतनीस मंगला संजय महाजन (३९, मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीनुसार, १७ रोजी दुपारी एक ते १८ रोजी सकाळी नऊ दरम्यान चोरट्यांनी अल्फला शाळेजवळील अंगणवाडी क्रमांक १८ च्या दरवाजाची फळी तोडून दोन हजार दोनशे रुपये किंमतीचे सिलिंडर लांबवले. तपास हवालदार मोहम्मद अमीरखा तडवी करीत आहेत.

