भुसावळातून ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी लंपास
A two-wheeler worth Rs 30,000 from Bhusawal भुसावळ : शहरातील शिवपूर कन्हाळा रोडवरील गणराय विहारसमोरून चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
शेतकरी राहुल सुभाष पाटील (२४) यांच्या तक्रारीनुसार, ५ ते ६ नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी शिवपूर कन्हाळा रोडवरील गणराय विहारासमोरून दुचाकी (एम.एच.१६ डी.के.७४८३) लांबवली. तपास नाईक भूषण जैतकर करीत आहेत.


