यावलमध्ये बुरूज चौकात तुंबळ हाणामारी : सहा जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा


Clash at Buruj Chowk in Yawal : Riot Case Against Six Persons यावल : शहरातील अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील बुरूज चौकात सहांमध्ये झोंबाझोंबी सुरू असल्याने पोलिसांनी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली तर सहा संशयीतांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा संशयीतांना अटक
यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर बुरुज चौकात संशयीत शेख सत्तार शेख मुनाफ (60), शेख आसीफ शेख सत्तार (22), रजीया बी.शेख सत्तार (इंदिरानगर, धानोरा, ता.चोपडा), शेख निसार शेख बशीर (ईस्लामपुरा, यावल), शेख साबीर शेख निसार (बाबा नगर, यावल), शकीला बी.शेख रफिक (यावल) हे सहा जण आपसात भांडण करीत असतान सार्वजनिक शांतता भंग करीत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिसात हवालदार राजेश वाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !