भुसावळातील तालुक्यातील तरुणाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल न करण्याची देत उकळली दिड लाखांची खंडणी


A young man from Bhusawal taluka was paid a ransom of half a lakh for not letting the obscene video go viral भुसावळ : तक्रारदाराच्या नकळत बनवलेला अश्लिल व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत क्राईम ब्राँच तसेच युट्यूब अधिकारी असल्याचे सांगत भुसावळ तालुक्यातील एका गावातील तरुणाकडून एक लाख 40 हजार रुपयाची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात तीन अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

रेकॉर्डींग व्हायरलची धमकी देत उकळली खंडणी
भुसावळ शहरानजीक असलेल्या एका गावातील 32 वर्षीय तरुणाचा संभाषणादरम्यान अश्लील व्हिडिओ बनवून हे कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत संशयीतांनी आम्ही युट्यूबचे अधिकारी तसेच क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून 21 ते 22 नोव्हेंबरच्या दरम्यान एक लाख 39 हजार 740 रुपयांची खंडणी गुगलपेच्या माध्यमातून उकळण्यात आली.



अधिकारी असल्याचे सांगून वाढवला दबाव
संशयीतांनी आम्ही क्राईम ब्रँचचे अधिकारी तसेच युट्यूबमध्ये अधिकारी असल्याचे भासवूनही दबाव निर्माण करीत फसवणूक केली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून 79943-38106, 78550-77387 व 71780-72627 या क्रमांकावरील मोबाईल धारकाविरोधात जळगाव सायबर सेलला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !