मुक्ताईनगर स्टेट बँकेच्या पाठपुराव्यानंतर लाभार्थीच्या मुलाला मिळाली विम्याची रक्कम


मुक्ताईनगर : शहरातील स्टेट बँक शाखेत आशा वर्कर मीरा किसन भालेराव (वाघोडे) यांचे खाते होते शिवाय 22 जून 2022 रोजी वार्षिक 20 रुपये याप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची रक्कमही कपात करण्यात आली मात्र 12 ऑगस्ट रोजी 2022 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारस असलेल्या मुलाला विम्याची रक्कम मिळणे गरजेचे होते. या संदर्भात स्टेट बँकेने वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर मीरा भालेराव याचा वारस मुलगा अमर रवींद्र वाघोडे याला नुकताच दोन लाख रुपये रकमेचा धनादेश बँक व्यवस्थापक निशा बांदेकर ,बँकेचे अधिकारी संतोष दराडे यांचे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. बँकेने विमा रक्कम मिळवून दिल्याने बँकेचे भालेराव कुटूबियांनी आभार मानले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !