चिनावलमधील अल्पवयीन मुलास अज्ञाताने पळवले
A minor was abducted by an unknown person in Chinawal सावदा : चिनावल गावातील 16 वर्षीय चिमुकल्यास अज्ञाताने पळवून नेल्याप्रकरणी सावदा पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वेदांत प्रभाकर अहिरे (चिनावल) असे पळवून नेण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
अलका प्रभाकर अहिरे (जुना बौद्धवाडा, वडगावरोड, चिनावल) यांच्या फिर्यादीनुसार, चिनावल गावातील नूतन हायस्कूलच्या मागील रस्त्यावरून वेदांत यास अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवत पळवून नेले. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. तपास हवालदार संजीव चौधरी करीत आहेत.


