पहिली पत्नी असतांना दुसरे लग्न : तिघांविरोधात गुन्हा
यावल : पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केल्यानंतर दुसर्या पत्नीकडून पहिल्या पत्नीस न्यायालयाच्या रस्त्यावर पतीसमोर दुसर्या पत्नीने जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पहिल्या पत्नीने दिलेल्या फिर्यादी वरून यावल पोलिसात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा
यावल शहरातील न्यायालयाच्या रस्त्यावर ममता जितेंद्र परदेशी (जळगाव रोड, खैरणार वाडी, श्रीनगर, भुसावळ) या जात असताना त्यांना त्यांचे पती जितेंद्र फुलचंद परदेशी, भारती जितेंद्र परदेशी (श्रीराम नगर, यावल) व कल्पेश कासे (रेल्वे हॉस्पिटलच्या मागे, भुसावळ) हे दिसले असता जितेंद्र परदेशी यांच्या दुसर्या पत्नी भारती परदेशी यांनी पहिल्या पत्नी ममता परदेशी यांचा रस्ता अडवत आता आम्ही लग्न केले असून आम्हाला एक मुलगा असल्याने आमच्यात येवू नका अन्यथा तुला ठार मारू. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात पहिली पत्नी हयात असतांना तिला फारकत न देता लग्न करणे व शिवीगाळ करून धमकी देणे आदी कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.


