जळगावात दोन गट भिडले : परस्पर विरोधी गुन्हे
Two groups clashed in Jalgaon: opposing crimes जळगाव : शहरातील जाखनीनगर कंजरवाडा परीसरात तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात दाखल अर्ज मागे घेण्याच्या वादातून रविवारी दुपारी दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.
परस्परविरोधी मारहाणीचे गुन्हे दाखल
सावन वजीर गागडे (67) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जयेश दिलीप माचरे यांचा भाऊ रितेश याने रविवार, 20 ऑक्टोबर 2022ला आत्महत्या केली होती. त्याबाबत गागडे कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. रविवारी दुपारी गागडे हे बसलेले असताना शशिकांत दिलीप बागडे हा येथे येऊन शिवीगाळ करून फोटो काढले. संजय बाटुंगे, राहुल माचरे, आकाश माचरे, दीपमाला बाटुंगे, दिशा भाट, तमन्ना माचरे, रत्नाबाई बागडे, रितीक बागडे यांनी शिवीगाळ व व्हॅनचे नुकसान केले. घरात घुसून महिलांना मारहाण केली.


दुसर्या गटाचीही मारहाणीची तक्रार
दुसरी तक्रार श्रद्धा जयेश माचेकर (वय 25) यांनी दिली आहे. श्रद्धा या पती जयेश सोबत हॉस्पिटलमधून परत येत असताना सावन गागडने तक्रार मागे घेण्याचे सांगितले. त्यानंतर सावन गागडेने जयेशच्या डोक्यात दगड मारले. सुधीर याने मारहाण केली. विकास व राजू गागडे याने पोटात लाथ मारली. घरात जाऊन नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
