भीषण अपघातात पाचोर्यातील दोघे ‘एकुलते एक दीपक’ विझले
Two ‘one and only youths’ from Pachora died in a terrible accident पाचोरा : यात्रेतून जागा सांभाळून घराकडे परतणार्या युवकाच्या वाहनाने अज्ञात वाहनाने उडवल्याने पाचोरा शहरातील दोघे युवक जागीच ठारले. भडगाव रोडवरील अंकीत कॉटन जिनिंगजवळ हा अपघात सोमवार, 28 रोजी रात्री उशिरा हा अपघात घडला. गोपाल गोवर्धन पुजारी (40, रा.बाहेरपुरा, पाचोरा) व खुशाल अर्जुन सोनार (25, संभाजी नगर, पाचोरा) अशी मयत युवकांची नावे आहेत.
जागा सांभाळणे बेतले जीवावर
सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी आमडदे, ता.भडगाव येथे यात्रोत्सव असल्याने व्यवसायासाठी जागा सांभाळण्यासाठी दोघे युवक रविवार, 27 नोव्हेंबर रोजी आमडदे येथे गेले होते. 27 रोजी रात्री उशिरा आमडदे येथुन मोटरसायकलने पाचोरा येथे येण्यासाठी निघाल्यानंतर मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास भडगाव ते पाचोरा दरम्यान अंकीत कॉटन जिनिंगजवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात गोपाल पूजारी जागीच ठार झाला तर खुशाल सोनार हा गंभीर जखमी झाला. त्यास जळगंव येथे उपचारासाठी दाखल केले असता खुशालचा सोमवार 28 रोजी मृत्यू झाला.


दोघांच्या मृत्यूने हळहळ
मयत गोपाल पूजारी यांच्या पश्चात्य वृद्ध आई, पत्नी व बहिण तर खुशाल सोनार याच्या पश्चात आई, वडिल, बहिण असा परीवार आहे. गोपाल पुजारी व खुशाल सोनार हे परीवारातील एक दीपक असल्याने पूजारी व सोनारी कुटुंबावर दुःखाचे संकट कोसळले आहे. मृत्यू प्रकरणी सुरूवातीला पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
