रावेर शहरात दुकान फोडले : 25 हजारांचा मुद्देमाल लंपास


रावेर : शहरात दुकानाचे शटर उघडून तब्बल 25 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शेख आरीफ शेख रऊफ (35) यांचा प्लॉट खरेदी-विक्रीचा चसून रावेर शहरातील सावदा रोड येथे यांचे कार्यालय आहे.

अज्ञात चोरट्यांचा शोध
अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे कार्यालयाचे शटर उघडून सुमारे 23 हजारांची बॅटरी व दोन हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटर लांबवली. याबाबत शेख आरीफ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक सुरेश मेढे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !