भुसावळ तालुका ग्रामपंचायत निवडणूक : 29 अर्ज दाखल


Bhusawal Taluka Gram Panchayat Election : 29 applications filed भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचातीसाठी निवडणूक तर तीन ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होत असून त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बुधवार, 18 रोजी सात ग्रामपंचायतीसाठी 29 तर तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका
भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत तर तीन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. बुधवारी अर्ज दाखल झालेल्या ग्रामपंचायतीत वराडसीम-जोगखोरी- 10, सुनसगाव- पाच, चोरवड- आठ, अंजनसोडे व गोजोरे प्रत्येकी- एक, फुलगाव- चार असे एकूण 29 अर्ज दाखल झाले तर शिंदी येथील पोटनिवडणुकीसाठी दोन तर मांडवेदिगरसाठी एक अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !