फैजपूर शहरात सलग चौथ्यांदा 11 ते 15 फेब्रुवारीदरम्यान होणार विद्यापीठाचा युवारंग महोत्सव


Yuvarang Mahotsav this year in Faizpur: Organized from 11th to 15th February जळगाव : सळसळत्या तरुणाचा जल्लोष व आकर्षण असलेला महोत्सव म्हणजे युवारंग. यंदा या महोत्सवाचे आयोजन फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात 11 ते 15 फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव (युवारंग) सलग चौथ्यांदा फैजपूर शहरात होत आहे हे विशेष !

महोत्सवाच्या तयारीला वेग
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी दरवर्षी युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यापीठ संलग्न महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्था, शैक्षणिक प्रशाळा विभागातील नियमित विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असतो. या वर्षीचा युवारंग युवक महोत्सव फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात होत आहे. आयोजनाचा चौथ्यांदा बहुमान या संस्थेला मिळाला आहे. महोत्सवाच्या नियोजनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे.

दीड हजारावर विद्यार्थी
महोत्सवाचे नियोजन म्हणजे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. एकाच संस्थेच्या आवारात वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांचे सादरीकरण होत असते. खान्देशातून आलेल्या सुमारे दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असतो. स्पर्धकांची पाच दिवसांची निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांना उभी करावी लागते. आयोजनासाठी विद्यापीठाकडूनही आर्थिक योगदान असते. फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाने यशस्वी आयोजनातील आपले वेगळेपण जपले आहे. त्यामुळे सलग चौथ्यांदा महोत्सव घेण्याची संधी त्यांना मिळाली असल्याचे मानले जात आहे.


कॉपी करू नका.