कोळवदला खळ्याला आग : सुमारे 12 लाखांचे नुकसान


Kolvada barn fire : Loss around 12 lakhs यावल : तालुक्यातील कोळवद येथे सोमवारीच रात्रीच्या सुमारास गावालगत असलेल्या खळ्याला अचानक आग लागून शेती अवजारांसह शेती साहित्य, गुरा-ढोरांचा चारा जळून खाक झाल्याने सुमारे 12 लाखांवर नुकसान झाले. सुदैवाने वेळीच गुरांनी बाहेर काढण्यात आल्याने प्राणहाणी टळली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले.

रात्रीच्या सुमारास भडकली आग
कोळवद येथील शेतकरी पराग रवींद्र चौधरी यांचे गावालगत खडकाई नदीच्या काठी गुरा-ढोरांचा चारा आणि शेती अवजारे साहित्य ठेवण्यासाळी भला मोठे खळा आहे. या खळ्याला सोमवारी रात्री अचानक आग लागली व या आगीने रुद्ररूप धारण केले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर नागरीकांनी खळ्याकडे धाव घेतली व खळ्यात बांधलेली जनावरे बाहेर काढली तसेच इतर साहित्य पटापट बाहेर काढले मात्र या आगीत 12 ते 15 लाखांचे साहित्य खाक झाले. त्यात यात गुरा-ढोरांचा चारा, शेती अवजारे, संपुर्ण पत्री शेड, ठिबक पाईप, ठिबकच्या नळ्यांचा समावेश आहे. आग विझवण्यासाठी यावल नगरपालिकेच्या अग्नीशमन बंबास पाचाराण करण्यात आले मात्र बंब येईपर्यंत आगीत सर्व जळून खाक झाले. याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व महसूल विभागालादेखील माहिती देण्यात आली. दोघा विभागाकडून घटनास्थळी धाव घेण्यात आली.



ट्रक्टर, ट्रॉली काढली बाहेर
या शेडमध्ये शेतकरी पराग रवींद्र चौधरी यांचे ट्रॅक्टर व ट्राली होती विशेष म्हणजे ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल होते. आगीनंतर ते लगबगीने बाहेर काढण्यात आले अन्यथा आग वाढून शेजारी रहिवासी वस्तीचे मोठे नुकसान झाले असते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !