हळदी कुंकवाचा वाण देवून त्यांनी पेरला प्रभाग क्रमांक 24 मध्ये ‘उजेड’

सामाजिक कार्यकर्त्या दीपाली वाणी (बर्‍हाटे) यांचा स्तुत्य उपक्रम


He planted ‘Ujed’ in Ward No. 24 by giving a variety of turmeric भुसावळ : महाराष्ट्रातील नववर्षातील सर्वात मोठा सण अर्थातच मकरसंंक्रांती. या सणाला महिलावर्गाकडून तीळ-गुळासोबतच वाण देण्याची प्रथा असहे शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील सामाजिक कार्यकर्त्या दीपाली गलू वाणी (बर्‍हाटे) यांनी दिड हजार तांब्याचे दिवे महिलांच्या घरोघरी जावून वाटप केले सोबतच हळदी-कुंकू देत तीळ-गुळाचे लाडू देवून नववर्ष सुख-समाधानासह भरभराटीचे जाण्यासाठी सदिच्छाही दिल्या.

घरपोच आलेल्या वाणामुळे महिलाही सुखावल्या
दीपाली गलू वाणी (बर्‍हाटे) यांनी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलावर्गाच्या येणार्‍या अडचणी लक्षात घेवून घरोघरी जावूनच वाण देण्याचा संकल्प केला व पूर्णत्वासही नेला. महिलावर्गाला तांब्याच्या दिव्यासोबतच तीळगुळ व हळदी-कुंकूही देण्यात आला व नव्या प्रथेची सुरूवातही यानिमित्ताने झाल्याचे दिसून आले. स्वामी समर्थ कॉलनी, माऊली नगर, सरस्वती नगर, लक्ष्मी नगर, अंबरनाथ नगर, महेश नगर, पंढरीनाथ नगर, विकास कॉलनी, चंद्रमा नगर, पियुष कॉलनी आदी प्रभागातील महिलांना संक्रांतीचे वाण देण्यात आले.


कॉपी करू नका.