भुसावळात सहा केंद्रावर बारावीचे तीन हजार 187 विद्यार्थी देणार परीक्षा
21 मार्चपासून बारावी परीक्षेला सुरूवात ः यंदा अभ्यासक्रमावरयच परीक्षा
भुसावळ : बारीक्षेला मंगळवार, 21 मार्चपासून सुरूवात होत असून त्यादृष्टीने शहरात शालेय प्रशासनाने नियोजन केले आहे. शहरातील सहा केंद्रावर होणार्या परीक्षेसाठी यंदा तीन हजार 187 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. परीक्षेच्या नियोजनाबाबत गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी गुरुवारी गटशिक्षणाधिकारी केंद्र संचालकांची बैठक घेत त्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
दहा मिनिटांची वेळ वाढवली
यंदा परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त पार पाडण्याचे शालेय विभागाचे नियोजन आहे शिवाय यंदा अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा होत आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून यंदा बोर्डाकडून 10 मिनिटांचा अवधी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढवून देण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांवर बाहेरील कुठल्याही व्यक्तीला प्रवेश देता येणार नाही जर केंद्रात अशी एखादी व्यक्ती आढळली तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर बोर्डाकडून कारवाई केली जाईल, असे गटशिक्षणाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.






यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला डीएल हिंदी हायस्कूलचे केद्र संचालक एम.आर.माहेश्वरी, के.नारखेडे महाविद्यालयाचे एन.बी.किरंगे, संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाचे व्ही.एस. पाठक, बी.झेड. उर्दू हायस्कूलचे असलम मोहंमद बेग, नाहाटा महाविद्यालयाचे वाय.एम.पाटील, बियाणी ज्युनियर महाविद्यालयाचे के.पी.चौधरी तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


