यावल तालुक्यात कापूस खरेदीत मापात पाप : व्यापार्याला 11 हजाराचा दंड
Improper purchase of cotton in Yaval taluka: Fine of 11 thousand to trader यावल : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वड्रि गावी शेतकर्याच्या कापूस मोजणीत मापात केल्या प्रकरणी संबंधित व्यापार्यावर यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने 11 हजारांची दंडात्मक कारवाई केल्याने व्यापार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. प्रशासक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चोपडा यांनी ही कारवाई केली.
कारवाईने व्यापार्यांमध्ये खळबळ
यावल तालुक्यात पांढर्या सोन्याची म्हणजे कापूस खरेदी करताना मापात पाप करून शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात होती. एका शेतकर्याने कापूस व्यापार्याची लबाडी प्रत्यक्ष पकडून तक्रार केल्यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चोपडा यांच्याकडे सध्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक पद असल्याने त्यांनी या वृत्ताची दखल घेत संबंधित व्यापार्याची माहिती घेत 11 हजार रुपये दंडाची आकारणी केली. यावल तालुक्यात यापुढे अशा काही व्यापार्यांचा संशय आल्यास तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी कळविले आहे.

