यावल शेत-शिवारातून माथेफिरूने 25 लाखांची केळी कापून फेकली

यावल पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा : शेतकरी वर्गातुन संताप


Mathefiru cut a banana worth 25 lakhs and threw it away from Yaval Shet-Shiwar यावल : तालुक्यातील अट्रावल शिवारातील शेतातून कापणीयोग्य सात हजार केळीची खोडे अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. या घटनेत केळी उत्पादकाचे तब्बल 25 लाखांचे नुकसान झाले. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञातांकडून पुन्हा नुकसानीचे प्रकार सुरू
अट्रावल येथील शेतकरी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या मालकीचे यावल शिवारातील शेत गट नंबर 907 आहे. यामध्ये एक हेक्टर 86 आर या क्षेत्रावर त्यांनी केळीची लागवड केली आहे. दोन वर्ष वाढ होवुन केळी कापणी योग्य झाली असताना रविवारी त्यांच्या शेतातील केळीची खोडे मोठ्या प्रमाणात कापून फेकल्याचे दिसून आले. राजेंद्र चौधरी यांनी शेतात जावून पाहणी केली असता त्यांनी लागवड केलेल्या नऊ हजार खोडांपैकी तब्बल सात हजार केळीच्या खोडांची कापून फेकत नासधूस केल्याने 25 लाखांचे नुकसान झाले. यावल पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांसह आमदारांची पाहणी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार शिरीष चौधरी, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील, फैजपूर विभागाचे पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी शेतात भेट देवुन पाहणी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !