चोरीच्या 12 दुचाकींसह अट्टल दुचाकी चोरटे सावदा पोलिसांच्या जाळ्यात


Atal bike thieves with 12 stolen bikes in police net सावदा : चोरीच्या तब्बल 12 दुचाकींसह अट्टल चोरट्यांना सावदा पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. जावेद मुबारक तडवी (पातोंडा, ता.बर्‍हाणपूर) व मुनाफ मुबारक तडवी (कोळवद, ता.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

नाकाबंदीदरम्यान अडकला संशयित जाळ्यात
सावद्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हवालदार उमेश पाटील, विनोद पाटील, संजीव चौधरी, मोहसीन खान पठाण, यशवंत टहाकळे, विनोद तडवी, मनोज तडवी, नामदेव कापडे यांनी नाकाबंदीदरम्यान संशयित जावेद मुबारक तडवी (पातोंडा) याला विना क्रमांकाच्या दुचाकीसह पकडल्यानंतर त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली तसेच यााबाबत सावदा पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे उघड झाल्याने आरोपीने आपला साथीदार मुनाफ मुबारक तडवी (कोळवद) असल्याची कबुली देत आतापर्यंत रावेर तालुक्यातील सावदा, रावेर, चोपडा, नेरी, ता.जामनेर, लालबाग, ता.बर्‍हाणपूर भागातून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आत्तापर्यंत 12 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
पुढील तपास सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, उमेश पाटील, संजीव चौधरी, मोहसीन खान पठाण, विनोद तडवी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !