डोणगाव येथून घराबाहेर लावलेल्या दोन दुचाकी लांबवल्या
यावल : तालुक्यातील डोणगाव येथून घराबाहेर लावलेल्या दोन मोटरसायकल लांबवण्यात आल्या. यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
डोणगाव येथील मनोज अशोक पाटील यांनी आपल्या घराच्या बाहेर दुचाकी (क्रमांक एम. एच.19 डी.डी. 5013) व दुसरी दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 डी. बी. 2111) अंगणात लावली असता चोरट्यांनी त्या लांबवल्या. यावल पोलिसात मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरूध्द दोन दुचाकी चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे.

