यावलला 45 वर्षीय इसमास मारहाण : सहा संशयीतांना अटक


45-year-old Ismas beaten up in Yava l: Six suspects arrested यावल : शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मागे असलेल्या बालाजी सिटीमध्ये एका 45 वर्षीय इसमाला सात जणांनी मारहाण केली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. यात एका अल्पवयीनाचा समावेश असून त्यास बालसुधारगृहात पाठवण्यात आले तर अन्य पाच जणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

सहा संशयीतांना पोलिसांनी केली अटक
यावल महाविद्यालयाच्या मागे बालाजी सिटी वसाहतीत विजय गणपत बारी (45) यांना काही एक कारण सात तरुणांनी मारहाण केली होती. पोलिसांनी या प्रकरणी कुणाल सतीश गजरे (श्रीराम नगर), भारत धर्मा घारू (बोरावल गेट, फिल्टर हाऊस), अर्जुन प्रवीण अडकमोल (रा.पंचशील नगर), आकाश मधुकर बिर्‍हाडे (सिध्दार्थ नगर), गौरव सदानंद गजरे (बोरावल गेट फिल्टर हाऊस) यांना अटक केली तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !