भुसावळात किरकोळ वादातून एकास मारहाण : त्रिकूटाविरोधात गुन्हा
A person was beaten up due to a minor dispute in Bhusawal: Crime against the trio भुसावळ : किरकोळ वादातून एकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार अक्षय उर्फ भरत नरहरी धाडे (27, महेश नगर, भुसावळ) यांनी रस्त्यावर वाहन सरकावण्यास सांगितल्याच्या कारणावरून तिघांनी त्यांना मारहाण केली. ही घटना शुक्रवार, 3 रोजी रात्री नऊ वाजता निकुंज अपार्टमेंट शेजारील दुकानासमोर घडली. या प्रकरणी ऋषी मोरे, गणेश वरणकर, सुभाष मोरे (भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक शशीकांत तायडे करीत आहेत.

