जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल अड्ड्यावर धाड
लाखोंची रोकड , 14 वाहनांसह 17 जण ताब्यात : राजकीय पदाधिकार्यांमध्ये खळबळ
Jalgaon Crime Branch’s big operation: raid on high profile hideout in Raver taluka रावेर : तालुक्यातील मोरगाव गावाजवळील एका शेतात सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने सोमवारी मध्यरात्री छापेमारी करीत 17 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त करण्यात आल्याची माहिती असून दुसर्या दिवशी उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते तर काही संशयित अंधारामुळे पसार होण्यात यशस्वी झाले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला रावेर तालुक्यात हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास एलसीबीने स्थानिक पोलिसांना सोबत घेत मोरगाव जवळील एका शेतात धाड टाकली. यावेळी अचानक पोलिस आल्याचे दिसतात जुगार्यांमध्ये पळापळ सुरू झाली. पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेतले तर घटनास्थळावरून सुमारे दीड लाखांची रोकडसह दुचाकी व चारचाकी वाहने मिळून 14 वाहने जप्त केली. विशेष म्हणजे या हायप्रोफाईल जुगार अड्ड्याचा मालक हा एका बड्या राजकीय नेत्याचा समर्थक असल्याची जोरदार चर्चा आहे. या ारवाईमुळे रावेरसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

