प्रेयसीविरोधात वडिलांनी अपशब्द काढताच मुलानेच काढला काटा
As soon as the father used abusive words against the beloved, the son took the thorn पुणे : प्रेमात आंकठ बुडालेल्या तरुणाने आपल्या वडिलांनानाच संपवल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसीविषयी वडिलांनी अपशब्द वापरताच मुलाने बापाचा दोरीने गळा आवळून खून केला तर मोठा भाऊ आणि आईने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आत्महत्या झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. अशोक रामदास जाधव (45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तिघांविरोधात खुनाचा गुन्हा
मुलगा राहुल अशोक जाधव (25), अनिल अशोक जाधव (23) आणि अशोक यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून प्रकरणात उपनिरीक्षक अशोक काशिनाथ खंडाळे यांनी दिघी पोलिसात फिर्याद दिली.

दोरीने आवळला गळा
आरोपी अनिल याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते मसत्र अनिलच्या वडिलांनी त्याच्या प्रेयसीविषयी अपशब्द वापरून शिवीगाळ केली. याचा राग मनात धरून अनिल याने घरातील दोरीने त्यांचा गळा आवळला आणि खून केला. गळा आवल्यामुळे अशोक यांच्या नाका तोंडून फरशीवर रक्त पडले. आपल्या मुलाला वाचण्यासाठी आई आणि मुलाने जमिनीवरील रक्त अशोक यांच्याच शर्ट ने पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.आणि दुसर्या मुलाने फॅनला दोरी लावून आत्महत्या असल्याचा बनाव रचला. पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला.
धुलिवंदनाच्या आनंदावर विरजण, हात-पाय धुताना नदीत बुडून पुण्यात विद्यार्थ्याचा मृत्यू
मात्र, या प्रकरणात पोलिसांना संशय आला. पोलिसांनी माय लेकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.
