धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू : सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना
Passenger dies after falling from running train : Incident near Savada railway station भुसावळ : सावदा रेल्वे स्थानकानजीक धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सावदा रेल्वे स्थानकानजीक 17020 मधून पडल्याने 42 वर्षीय अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला. किलोमीटर क्रमांक 459 जवळ अनोळखीचा मृतदेह आढळला.
ओळख पटवण्याचे आवाहन
मयताची उंची 5.2 इंच, रंग सावळा, शरीरबांधा बळकट, डोक्याचे केस काळे, चेहरा काल, नाक सरळ, डोळे बारीक तसेच अंगात गुलाबी टी शर्ट , ग्रे रंगाची पँट असे मयताचे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास लोहमार्गचे नाईक सचिन एस.गुप्ता (9145778286) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

