मुक्ताईनगरात एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त

गुटखा तस्करांमध्ये खळबळ :P खडसे म्हणाले मुक्ताईनगर तस्करीचे केंद्र


Gutkha worth Rs 1 crore seized in Muktainagar मुक्ताईनगर : शहरातून होणार्‍या गुटख्याच्या वाहतुकीबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी वारंवार आवाज उठवत पोलिस प्रशासनावरही हप्तेखोरीची टिाक केली होती तसेच विधानसभेत हप्त्यांची आकडेवारी मांडत गृह विभागाला अंतर्मुख केले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली असून पुन्हा गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुटख्याची पोलिस ठाण्यात मोजदाद सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

बाजारमूल्यानुसार दिड कोटींचा गुटखा
मुक्ताईनगर शहरात अन्न व औषध प्रशासनाने गुटख्याने भरलेला ट्रक पकडला असून या कारवाईने मोठी खळबळ उडाी आहे. 56 लाख रुपये किंमतीचा हा गुटखा असलातरी त्याचे बाजारमूल्य तब्बल एक कोटी रूपये असल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा ट्रक मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जमा करण्यात आला असून अधिकार्‍यांकडून दिवसभर ट्रकमधील गुटख्याची मोजणी सुरू होती. कारवाई करणार्‍या पथकाचे खडसेंनी प्रत्यक्ष जावून अभिनंदन देखील करीत यापुढेदेखील अशाच पद्धत्तीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.

मुक्ताईनगर तस्करीचे केंद्र
याप्रसंगी खडसे म्हणाले की, गेल्या एक महिन्यातच दीड कोटी रुपयांचा गुटखा पकडण्यात आला असून मुक्ताईनगर तालुका गुटखा आणि गांजा तस्करीचे मोठे केंद्र बनले आहे. रविवारी अन्न व औषध प्रशासनाने गुटख्याचा मोठा साठा जप्त केल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनावर जोरदार टिका करत गंभीर आरोप केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !