रावेरच्या नूतन तहसीलदारपदी बंडू कापसे
रावेर : शहराच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची कार्यकाळ पूर्ण झाल्याने प्रशासकीय बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी कळवण, जि.नाशिक येथील तहसीलदार बंडू कापसे यांची नियुक्ती करण्यात आली.
नूतन तहसीलदारांनी पदभार स्वीकारला
बदलीचा आदेश 31 मार्च रोजी निघाला असून नवनियुक्त तहसीलदार कापसे यांनी जळगावात येवून पदभार घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, रावेरच्या तहसीलदार देवगुणे यांच्या नियुक्ती आदेश अद्याप निघालेले नसून शासनाने दरवर्षी रावेर तालुक्याला दिलेले महसूल कराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विक्रम देवगुणे त्यांच्या कार्यकाळात केला आहे.

