वांजोळा, खंडाळा येथे होणार ग्राम पंचायतीची पोटनिवडणूक
भुसावळ : तालुक्यातील वांजोळा, खंडाळा येथील ग्राम पंचायतीच्या प्रत्येकी एक-एक वॉर्डाची पोट निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर झाली आहे. 18 मे या दिवशी मतदान होणार आहे. तालुक्यातील वांजोळा येथील वॉर्ड 3 मधील सदस्या सरूबाई भिल यांचे निधन झाल्यामुळे तेथील रिक्त जागेसाठी तेथे पोट निवडणूक होणार आहे. तसेच खंडाळा येथील वॉर्ड 3 मधील पोट निवडणूक होणार आहे. तेथील उपसरपंच सतीश चौधरी यांनी त्यांच्या पदाच्या दिलेल्या राजीनामामुळे तेथील जागा रिक्त झाल्याने मतदान होणार आहे.
चुरस वाढणार
वांजोळा येथील वॉर्ड 3 मधील व खंडाळा येथीलही वॉर्ड 3 मधील पोट निवडणूक होणार आहे. निवडणूकीची नोटिस 18 एप्रिलला होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ ही 25 एप्रिल ते 2 मे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात भरता येणार आहे. 3 मे रोजी दाखल अर्जांची छाननी सकाळी 11 वाजता होईल. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतीम तारीख ही 8 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यत आहे. 18 मे या दिवशी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यत मतदान होणार आहे. मतमोजणी व निकाल हा दि. 19 मे रोजी होणार आहे. पोट निवडणूक होणार असल्याने वांजोळा व खंडाळा येथे इच्छूकांची भाऊ गर्दी सुरू झाली आहे.

