शहादा शहरात बेकरी फोडून लाखाची रोकड लांबवली


In Shahada city, a bakery was broken and cash of lakhs was stolen शहादा शहरातील बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावरील अयांगर बेंग्लोर बेकरीतून चोरट्यांनी एक लाखांची रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. या चोरीने शहरातील व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा कसून शोध
शहादा शहरातील बस स्थानकासमोरील अय्यंगार बंग्लोर बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या शटरला तोडण्याच्या प्रयत्न करण्यात आला मात्र ते न तुटल्याने चोरट्यांनी बाथरूमच्या वरील खिडकीची जाळी तोडत दोन चोरट्यांनी बेकरीत प्रवेश करीत इलेक्ट्रिक बिल भरण्याची रक्कम व दोन दिवसाच्या ग्राहकांच्या गोळा झालेली रक्कम अशी एक लाखांची रोकड लांबवली. सोमवारी सकाळी काम करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना गल्ला व त्याच्या जवळील कपाट अस्ताव्यस्त केलेले दिसल्याने त्यांनी बेकरीचे चालक सागर शिवकुमार शेट्टीगिरे यांना घटना कळवली. शहादा पोलिसांना माहिती कळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे आपल्या कर्मचार्‍यांसह दाखल झाले. चोरट्यांनी बेकरीतील सी.सी.टी.व्ही.ची तोडफोड केली असून चोरट्यांनी या दुकानाच्या आजूबाजूलाही काही दुकानांवर डल्ला मारल्याची चर्चा आहे. या प्रकरणी सागर शिवकुमार शेट्टीगिरे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.


कॉपी करू नका.