रेशनकार्डासाठी लाच : नंदुरबार पुरवठा विभागातील ऑपरेटर दोघे जाळ्यात


Bribery for ration card : Two operators of Nandurbar supply department in the net नंदुरबार : रेशनकार्ड बनवून देण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारताना नंदुरबार पुरवठा विभागातील संगणक ऑपरेटरसह खाजगी लेखनिकाला नंदुरबार एसीबीने बुधवारी दुपारी अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली. खाजगी लेखनिक वसीम बशीर पिंजारी (26, देसाईपुरा, नंदुरबार) व पुरवठा विभागातील संगणक ऑपरेटर विशाल शिशुपाल घुगे (32, रा.ठाणेपाडा, ता.ंनदुरबार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

तहसीलमध्ये सापस्वी यशस्वी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथील 37 वर्षीय तक्रारदाराने या प्रकरणी तक्रार दिली होती. 11 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी नवीन रेशनकार्ड बनविण्याकरीता तहसील कार्यालयात अर्ज व कागदपत्रे बनविली होती. यावेळी खाजगी इसम वसीम याने तक्रारदार यांना मी रेशन कार्ड बनवून देईल, असे सांगितले होते मात्र रेशनकार्ड न मिळाल्याने 9 मे रोजी खाजगी इसम यांनी तक्रारदाराकडे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी एक हजारांची मागणी केली व 16 मे रोजी तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. आरोपी वसीम याने स्वतःसाठी सातशे रुपये व संगणक ऑपरेटर विशाल घुगे याच्यासाठी तीनशे रुपये अशी एक हजारांची लाच मागणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी नंदुरबार तहसील कार्यालयात लाच घेताना आधी वसीमला व नंतर विशालला अटक करण्यात आली. नंदुरबार शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, हवालदार ज्योती पाटील, अमोल मराठे, मनोज अहिरे, संदीप नावाडेकर, देवराम गावीत व चालक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.


कॉपी करू नका.