भुसावळात शाळा परीसरात प्रतिबंधीत सिगारेटची विक्री : व्यापार्याविरोधात गुन्हा
Prohibited sale of cigarettes in school premises in Bhusawal : Crime against traders भुसावळ : विद्यालयाला लागून सिगारेट व विडीची विक्री करण्यास मनाई असतानाही जनरल स्टोअर्समध्ये त्याची विक्री होत असल्याने बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत कारवाई केली. या प्रकरणी व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक हजार 10 रुपयांची सिगारेट व विडी जप्त करण्यात आली.
व्यापार्याविरोधात अखेर गुन्हा
शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाला लागून लकी जनरल स्टोअर्स असून ते गणेश वसंत वलकर (32, अण्णाभाऊ साठे नगर, भुसावळ) यांचे आहे. या दुकानात प्रतिबंधीत सिगारेट व विडीची विक्री होत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता कारवाई करीत एक हजार 10 रुपयांच्या सिगारेट व विडी जप्त केल्या. या प्रकरणी पोलीस नाईक यासीन पिंजारी यांच्या फिर्यादीवरून गणेश वलकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहेत.
