गोंडखेडच्या अल्पवयीन तरुणीला पळवले : तरुणाविरोधात गुन्हा


Gondkhed minor girl abducted : Crime against youth जामनेर : तालुक्यातील गोंडखेड येथून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एका विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

फूस लावून तरुणीला पळवले
जामनेर तालुक्यातील गोंडखेडला 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 14 मे रोजी रात्री 10 ते सोमवार, 15 मे रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी ही घरात झोपलेली असताना तिला फुस लावून पळवून नेण्यात आले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संशयित विशाल राजू गोमलाडू (गोंदले, ता.खुलताबाद) याच्यावर संशय व्यक्त करीत त्याच्याविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साहिल तडवी करत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !