डोंगरदेत दुचाकीच्या धडकेत सहा वर्षीय बालक गंभीर जखमी


Six-year-old seriously injured in two-wheeler collision in Dongarde यावल : तालुक्यातील डोंगरदे येथील आदिवासी पाड्यावर दुचाकीच्या धडकेत 6 वर्षीय बालक हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचाराकरीता आणण्यात आले. त्याच्या डोक्याला जबर दुखापत असल्याने त्याला प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

बालकाला खेळताना भरधाव दुचाकीने दिली धडक
डोंगरदे, ता.यावल येथील आदिवासी वस्तीवर रस्त्यावर शिवा किरण पावरा (6) हा बालक खेळत होता. खेळतांना तो रस्त्यावर आला येथे वळणावरून भरधाव वेगात जाणार्‍या दुचाकीने या बालकाला जबर धडक दिल्याने बालकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि तो गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच बेशुद्ध पडला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने कुटुंबीयांनी त्याला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी भुगवाड्या, अधिपरीचारिका दीपाली किरंगे, सुमन राऊत, वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, संजय जेधे आदींनी तातडीने या बालकावर प्रथम उपचार केले. बालकाची प्रकृती गंभीर असल्याने व डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !