फैजपूर शहरातील भाड्यांच्या दुकानातून भर दिवसा 28 हजारांची रोकड लंपास


28,000 cash was stolen from a rental shop in Faizpur city in one day यावल : फैजपूर शहरातील एका भाड्यांच्या दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून 28 हजार रुपयांची रोकड लांबवली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानाबाहेर येताच चोरट्यांनी साधली संधी
फैजपूर शहरात धोबीवाडा भागात इंडिया स्टील भांडे दुकान आहे. या दुकानाचे मालक रफिक खान शफीखान हे दुकान उघडे ठेवून बाहेर आले होते. दरम्यान हिच संधी साधत त्यांच्या दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत गल्ल्यातील 28 हजार 20 रुपयांची रोकड लांबवली. हा प्रकार रफिक खान हे दुकानात परत आल्यानंतर उघडकीस आला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल मोहे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !