दहिगावच्या 29 वर्षीय विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ


A 29-year-old married woman from Dahigaon was harassed for two lakhs यावल : तालुक्यातील दहिगाव येथील माहेर असलेल्या 29 वर्षीय विवाहितेचा मुलगा होत नाही तसेच हुंड्यापोटी दोन लाख रुपये माहेरहून न आणल्याने पतीसह सहा जणांनी छळ केला व तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात उत्राण, ता.एरंडोल येथील पतीसह जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

उत्राणच्या पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा
दहिगाव, ता.यावल येथील माहेर असलेल्या सोनाली उर्फ आशा दीपक पाटील (29) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह मे 2018 मध्ये दीपक सुपडू पाटील (उत्राण) ांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर या विवाहितेला मुलगा झाला नाही तसेच माहेरहून तिने हुंड्यापोटी दोन लाख रुपये न आणल्याने पती दीपक सुपडू पाटील, सासरे सुपडू दगा पाटील, सासू सुनंदा सुपडू पाटील, नणंद प्रियंका हिरालाल पाटील (उत्राण), नणंद रेखाबाई संभाजी पाटील (भारुड, ता. चोपडा), शारदा दीपक पाटील (उंदीरखेडा, ता.पारोळा) या सहा जणांनी तिला शारीरिक मानसिक त्रास दिला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विवाहितेचा छळ करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !