रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार : कोरपावलीच्या तरुणाविरोधात गुन्हा
Rape Rape of minor girl in Raver taluka: Crime against youth of Korpavali of minor girl in Raver taluka: Crime against youth of Korpavali रावेर : रावेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीशी मैत्री वाढवून नंतर तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित शाहरूख सरवर तडवी (कोरपावली, ता.यावल) या तरुणाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मैत्री वाढवून केला अत्याचार
रावेर तालुक्यातील एका गावातील 16 वर्ष सहा महिने वयाची अल्पवयीन तरुणी कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी संशयित शाहरूख सरवर तडवी (कोरपावली, ता.यावल) हा तरुणीच्या संपर्कात आल्यानंतर त्याने तरुणीसोबत मैत्री केली व नंतर तिचा विश्वास संपादन करीत तिला लग्नाचे आमिष देत तीन ते चार वेळा रावेर तालुक्यातील एका गाातील शेतरस्त्यावर अत्याचार केला. पीडीतेने लग्नाची विचारणा करताना आरोपीने कानावर हात ठेवल्याने पीडीतेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने रावेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.
