मुक्ताईनगरात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यास मारहाण : दोघांविरोधात गुन्हा
मुक्ताईनगर : शहरातील सार्वजनीक बांधकाम खात्या अंतर्गत येणार्या विश्रामगृहात राहण्यासाठी खोली देण्याची मागणी दोघांनी केली मात्र पास (परवानगी) शिवाय ती देता येणार नाही, असा पवित्रा सहाय्यक स्थापत्य अधिकार्याने घेतल्यानंतर कर्मचार्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
शुक्रवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात संशयित योगेश काळे आणि संजय काळे (पूर्ण नाव माहित नाही) हे दोघे शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आले व त्यांनी विश्रामगृहाचा रूम देण्याची मागणी केली मात्र संबंधिताकडे रूमची परवानगी नसल्याने रूम देण्यास नकार दिल्यानंतर संबंधितांनी वाद घालत चे सहायक स्थापत्य अधिकारी यांना शिविगाळ करीत मारहाण केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून तु येथे नोकरी कशी करतो, तुला पाहून घेवू, अशी धमकीही हिदली. या प्रकरणी सार्वजनीक बांधकाम खात्याचे सहायक स्थापत्य अधिकारी सचितानंद अशोक शेजवळ (38, रा.शासकीय विश्रामगृह, मुक्ताईनगर) यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावरून योगेश काळे आणि संजय काळे (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे व विनोद श्रीनाथ हे करत आहेत.
