अंजाळे घाटाजवळ दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर


A young man died after falling off his bike near Anjale Ghat, another seriously यावल : यावल-भुसावळ रस्त्यावरील अंजाळे घाटाजवळ मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात 20 वर्षीय तरुण हा जागीच ठार झाला तर 26 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवार, 15 मे रोजी घडला होता. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवारी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मयताविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल
भुसावळ-रस्त्यावरील अंजाळे घाटाजवळ दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 ई.डी. 5285) द्वारे जितेंद्र सुभराम बारेला (20, रा.जामूनझिरा, ता.यावल) हा तरुण राजू रूमसिंग पावरा (26) सोबत जात असताना घाटाजवळ भरधाव वेगाने दुचाकी नेत असतांना दुचाकी घसरली. या अपघातामध्ये जितेंद्र बारेला हा जागीच ठार झाला तर राजू पावरा हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला प्रथम यावल रुग्णालयात व नंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. अपघात प्रकरणी राजू पावरा याच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात जितेंद्र सुबराम बारेला याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !